नाशकात मला कुणी विचारेना… आणि अक्षय कुमारची बडदास्त ठेवलीच कशी…!!छगन भुजबळांचा थयथयाट

विशेष प्रतिनिधी

नाशिक : अभिनेता अक्षयकुमार नुकताच नाशिक दौऱ्यावर येऊन गेला. त्याला हेलिकॉप्टर, मुक्कामासाठी रिसॉर्ट मिळालेच कसे? ग्रामीण ऐवजी शहर पोलिसांनी अक्षयकुमारला संरक्षण दिलेच कसे? याची चौकशी करणारच, असे सांगत अन्न व नागरी तथा पालकमंत्री छगन भुजबळांचा थयथयाट सुरू झाला आहे.

भ्रष्टाचार प्रकरणात मुंबईतील ऑर्थर रोडवरील तुरूंगाची हवा खात असताना नाशिकमधून त्यांना कोणी विचारायला गेले नाही. ते तिथे सतत आजारी होते. तरीही कोणी विचारपूस केली नाही. आता ठाकरे – पवार सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यावर भुजबळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा अँक्शन मोडमध्ये आले आहेत. मंत्रीपद स्वीकारल्यापासून भुजबळांचे ते दुखणे दूर पळाल्याची चर्चा आहे. तरी नाशिककरांवरचा तो राग कायम आहे. एवढ्यात तरी नाशिकररांना भुजबळांच्या दुखण्याविषयी काही ऐकायला मिळाले नाही उलट ते आता आक्रस्ताळेपणे अधिकाऱ्यांच्या आणि अन्य लोकांच्या मागे लागलेले दिसतात.

अभिनेता अक्षयकुमारच्या नाशिक दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी २४ तास कोरोनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या पोलिस दलाच्या मागे टुमणे लावले आहे. अक्षय कुमार ग्रामीण भागात असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट दिलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.

भुजबळांचा थयथयाट का…

मुख्यमंत्र्यापासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असतांना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी देण्यात आली?, हे त्यांनी त्रागा करण्याचे कारण आहे. आधी नाशकात भुजबळांचा जो रूबाब होता तो लोकसभेतील सलग दोन पराभवांनंतर उरलेला नाही. त्यावरूनही ते चिडलेले आहेत. म्हणूनच भुजबळांना नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार हा धक्कादायक वाटतो आहे. याची चौकशी तर व्हायलाच हवी, असे सांगूनच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*