भैंस का पाणा, मुनव्वर राणा आणि सेव्ह हिंदू गर्लस् ट्विटर ट्रेंड जोरात


  • फ्रान्समधील इस्लामी दहशतवादी हल्ले, लव्ह जिहाद विरोधात डावे लिबरल्स मूग गिळून गप्प
  • उत्तर प्रदेश पाठोपाठ हरियाणातही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : फ्रान्समधील इस्लामी दहशतवादी हल्ले आणि भारतातील लव्ह जिहाद प्रकरणातून झालेले हत्याकांड यावरून जगभर संताप उसळत असताना ट्विटरवरही त्याचे पडसाद उमटत आहेत. फ्रान्समधील बेछूट इस्लामी दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या शायर मुनव्वर राणा यांच्या विरोधात भैंस का पाणा, मुनव्वर राणा हे ट्विट जोरात ट्रेंड झाले आहेत. सुमारे तासाभरापूर्वीपासून सुरू झालेले ट्रेंडिंग २४ हजार जणांनी रिट्विट केले आहे.

त्याच बरोबर सेव्ह हिंदू गर्लस् हे ट्विटही दोन तासांपासून चांगलेच व्हायरल होत असून ३४ हजार जणांनी ट्विट – रिट्विट केले आहे. प्राऊड हिंदू चँलेंज हे ट्विट देखील २४ हजार जणांनी व्हायरल केले आहे. मुनव्वर राणाने मी देखील असेच खून केले असते असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्याविरोधात आज सकाळी फारसे कोणी बोलत नव्हते. परंतु, सायंकाळी ५.०० नंतर भैंस का पाणा, मुनव्वर राणा हे ट्विट व्हायरल झाले. लव्ह जिहाद आणि निकिता तोमरची हत्या याबाबत डावे लिबरल्स मूग गिळून गप्प बसले असताना हे ट्विटस् ट्रेंड होणे ही त्यांना चपराक मानली जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशापाठोपाठ आता हरियाणामध्ये देखील लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत हरियाणचे गृहमंत्री अनिल विज यांनी स्वत: ट्विटद्वारे माहिती दिली आहे. फरीदाबादच्या वल्लभगड येथे लव्ह जिहादमधून निकिता तोमर या विद्यार्थिनीची काँग्रेस आमदाराचा भाऊ तौसीफने हत्या केली. या हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल विज यांनी ट्वटि करत, हरियाणामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याचा विचार सुरू आहे, असे सांगितलं आहे.

फरीदाबाद हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने अगोदरच घेतलेला आहे. याबाबत देखील गृहमंत्री अनिल विज यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असं देखील त्यांनी ट्विट केलं होतं.

अनिल विज यांनी सांगितले की वल्लभगड प्रकरणाचा तपास एसआयटी आता २०१८ पासून करेल. जलगती न्यायालयात दररोज याप्रकरणी सुनावणी केली जाईल. या प्रकरणातील दोषींना दया माया दाखवली जाणार नसल्याचे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितले आहे. या अगोदर काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची अत्यंत गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसून आले.

अलाहबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत, लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी भर सभेत सांगितले होते. तसेच, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल. असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला होता.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था