मालेगावच्या जुलूसमधल्या कायदेभंगाकडे लिबरल मीडियाचा “कानाडोळा”


  • प्रसारमाध्यमांचे मुस्लिमांची तळी उचलण्यास प्राधान्य; ईद मिलाद शांततेत साजरा,असे झळकवले मथळे

विशेष प्रतिनिधी

मालेगाव : ठाकरे – पवार सरकारलाखिशात घालून घेऊन मुस्लिम समाजाने ईद-मिलाद सणानिमित्त नियमाची ऐशीतैशी करत शक्तीप्रदर्शन केले. राज्य, राष्ट्रीयस्तरावरील निवडक मीडियाने याची दखल घेत मुस्लिमांच्या या काळ्या कृत्यावर आपल्या बातमीपत्राद्वारे चौफेर टीका केले. मात्र, काही नावाजलेल्या लिबरल वृत्तपत्रांनी मुस्लिमांची तळी उचलत हा सण उत्साहात, शांततेत साजरा केल्याचे मथळे झळकवत योग्य असल्याची  पावती दिली.malegaon ka juloos

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने तसेच आरोग्य विभागाने वेगवेगळे नियम तयार करत लोकांना या नियमाचे पालन करण्याचे आदेश दिले आहे. मात्रकाही लोक आणि मुस्लिम समाज या नियमांकडे जाणूनबुजून “कानाडोळा” करत असल्याचे लक्षात आले. अर्थात प्रसारमध्यमातील काही वर्तमानपत्र,वाहिन्यांची त्यांना साथ असल्याचे दिसत आहे.malegaon ka juloos

मालेगावमधील कालच्या जुलूससाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम एकत्र आले होते. हे टिव्हीवर वारंवार दाखवत या लोकांविरूध्द पोलिस खाते काय पाऊल उचलणार? ,गुन्हे नोंदवणार का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील वाहिन्यांनी याची दखल घेतल्याने अगदी राष्ट्रीय स्तरावर हा विषय चर्चेला गेला.

जाहीरातींसाठी स्थानिक वर्तमानपत्राची साथ

मालेगाव म्हणजे जास्त मुस्लिमबहुल वसाहतीचा भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे छोटे, मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर असून व्यापारही जोरात असतो, त्यामुळे वर्तमानपत्रांना जाहिराती तसेच आर्थिक व्यवहारातून चालणारी पत्रकारिता येथेच मोठ्या प्रमाणावर दिसून येते, त्यातूनच काल झालेल्या गर्दीकडे दुर्लक्ष करत काही वर्तमानपत्रांनी हा सण शांततेत,उत्साहात साजरा झाला.

malegaon ka juloos

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला तसेच पोलिसांनी परवानगी न दिल्याने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळण्याऐवजी फक्त निषेध नोंदवण्यात आला असे काहीतरी प्रसिध्द करत गर्दीच्या संख्येकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. असे जाणूनबुजन खोटे आणि मुस्लिमसमाजाला साथ देणारे वार्तांकन करत आपलेपणा जणू काही वर्तमानपत्रांनी दाखवला, मात्र हे फार काळ लपवून राहणार नाही हेही मात्र तितकेच खरे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था