लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा बसवून मंडालेत स्मृती जागविणार

  •     म्यानमारकडून भारताकडे २२ अतिरेकी सुपुर्द

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्लीः भारताचा ईशान्येकडील हक्काचा शेजारी असलेल्या म्यानमारने सोमवारी महत्वपूर्ण पुढाकार घेतला. बंडखोरी करुन म्यानमारमध्ये आश्रय घेणाऱ्या २२ अतिरेक्याना पुन्हा भारताकडे सोपवण्याच्या म्यानमारच्या निर्णयाचे भारताने कौतुक केले.

परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्यानमारचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी म्यानमारच्या राष्ट्रीय नेत्या आँग सॅन स्यू की आणि डिफेंस सर्व्हीसचे कमांडर इन चीफ जनरल मिन आँग यांची भेट घेत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

मंडालेच्या तुरूंगात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ६ वर्षे आपले जीवन व्यतित केले. तसेच याच ठिकाणी मंडाले तुरूंगात अर्धपुतळ बसवून स्मृती जागविण्याचे ठरले. त्यासाठी स्मृतीशताब्दी वर्षाचे औचित्य साधले आहे, याच ठिकाणी गीतारहस्य हा ग्रंथ टिळकांनी लिहिला होता. याच तुरुंगात टिळकांच्या निधनानंतर 39 वर्षांनी त्यांचं स्मारक उभारत आहेत.

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी भारताने त्यासाठी म्यानमारला सर्व सहाय्य करण्याच्या भारताच्या भूमिकेचे म्यानमारने कौतुक केले आहे. २०१६ च्या भूकंपामध्ये नुकसान झालेल्या बगान पँगोडाच्या दूरूस्ती व संवर्धनासाठी मदत करणार आहे. चीन म्यानमार सोबत ऊर्जा सहकार्य संबंध बळकट करत असताना भारतही रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सध्या करतांना दिसत आहे.

त्या दृष्टीनेच भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांचा रविवार व सोमवार असा दोन दिवसांचा म्यानमार दौरा महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला सांस्कृतीक देवाणघेवाणीसाठी बाबी समजून घेण्यासाठी बर्मीसी भाषेचे भारतीय भाषांमध्ये रूपांतर करण्यावरही भर देण्यात आला. सीमेची सुरक्षितता आणि स्थैर्य लाभावे यासाठी दोन्हींनी लक्ष वेधले. त्यादृष्टीनेच भारताला २२ बंडखोरांना सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरक्षितता अन् स्थैयावर भर

उभय देशाच्या प्रतिनिधीमध्ये झालेल्या चर्चेत सीमारेषेचा भाग आणि त्यांच्या संबंधीत सर्वाची सुरक्षितता आणि तिथे स्थैर्य ठेवण्यावर भर देण्यात आला. एकमेकांच्या सीमावर्ती भागात कुणालाही हस्तक्षेप करू द्यायचा नाही प्रसंगी अशाप्रकारे घुसखोरी करणाऱ्यांवर जोरदार प्रतिकार करण्याचे ठरले तसेच एकमेकांना साथ देण्याचेही ठरले. म्यानमारमधील सध्याची परिस्थिती आणि त्यादृष्टीने विविध बाबींवर चर्चा झाली. अहिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि बळजबरी करून दहशत माजविणाऱ्या नागा मिलेटेट ग्रुप एनएससीएन(खपनाक) वर २८ सप्टेंबरला केंद्राने टाकलेली बंदीनंतर या चर्चेस प्राधान्य देण्यात आले.

दहशतवाद खतपाणी रोखण्यास मदत

गृह विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी बंडखोरांची मदत घेऊन त्यांना भरती करून नागा मिलेटेंट ग्रुपचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीयस्तरावरील सीमेवरील दहशतवादाचे कृत्य बळावणारे अशा समुहाला त्यामुले प्रोत्साहन मिळत होते. नागा मिलेंटेट ग्रुपने युनाइटेड लिब्रेशन फ्रंट ऑप असोम अर्थात उल्फा यांच्याशी तसेच मणिपूरमधील काही संघटनांशी जवळीक साधली होती.

या दौऱ्यात भारत आणि म्यानमारमध्ये पेट्रोलियम रिफायनरी उभारण्यासंबंधात चर्चा झाली. म्यानमारमध्ये उभारण्यात येणाऱ्या या पेट्रोलियम रिफायनरीत सहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल. यंगून जवळ थानलिन भागात भारताने पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले “आतापर्यंत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने या प्रकल्पात रस दाखवला असून, दोन्ही देशांसाठी हा प्रकल्प फायद्याचा आहे” असे सूत्रांनी सांगितले. म्यानमारच्या ऊर्जा क्षेत्रात एकटया चीनची ७०% परकीय गुंतवणूक आहे.

हर्ष श्रृंगला आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी म्यानमारच्या राष्ट्रीय नेत्या आँग सॅन स्यू की आणि डिफेंस सर्व्हीसचे कमांडर इन चीफ जनरल मिन आँग यांची भेट घेतली. यावेळी उभयदेशांमध्ये व्यापार,वाणिज्य आणि काही विमानतळासह पुढील काळात काही मोठे प्रकल्प उभारण्याबरोबरच चांगल्या कामांसाठी गुंतवणूक करण्याचे ठरले. या चर्चेमुळे दोन्ही देशात आशादायक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*