केरळच्या सोने स्मगलिंग प्रकरणात डी. कंपनीची लिंक; मुख्यमंत्र्यांचे यूएई कौन्सिल जनरलशी साटेलोटे

  • एनआयएकडे डी कंपनी लिंक चे पुरावे; मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : केरळच्या सोने स्मगलिंग प्रकरणात दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीची लिंक समोर आली आहे. डी कंपनीच्या नायजेरियातील मोऱ्हक्यांशी सोने स्मगलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी रमीस आणि शफरूद्दीन यांचे संबंध होते, असे राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने स्पष्ट केले आहे.

टांझानियातील डी. कंपनीकडून दोन्ही आरोपींनी सुरुवातीला पिस्तुले खरेदी केली होती. त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे असे एनआयएचे म्हणणे आहे. एरणाकुलम कोर्टात सात आरोपींच्या जामिनाला विरोध करताना एनआयएने वरील माहिती दिली.

तत्पूर्वी, सोने स्मगलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री स्वप्ना सुरेश हिने थेट केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनाच घेरले. तिने तपास यंत्रणांना मुख्यमंत्र्यांची आणि यूएई कौन्सिल जनरलशी दुबईत मीटिंग झाल्याची माहिती दिली. ही मिटिंग सरकारी नव्हती. तर ती खासगी आणि गुप्त स्वरूपाची होती.

त्यात मोठे डील झाले असण्याची शक्यता आहे, असे स्वप्ना सुरेशचे म्हणणे आहे. दुसरे दोन आरोपी रमीस आणि शफरूद्दीन टांझानियला अनेकदा गेले होते. तेथे डी. कंपनीच्या लोकांशी त्यांनी वारंवार संपर्क केला. याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. रमीसने सोने तेथून यूएईला नेले आणि तेथून केरळमध्ये आणल्याचे पुरावे आहेत.

टांझानिया आणि दुबई ही डी. कंपनीची सध्याची मुख्य केंद्रे आहेत. टांझानियातील डी. कंपनीचा कारभार सध्या भारतीय नागरिक फिरोज ओएसिस सांभाळतो. त्याच्यामार्फतच रमीसचा डी. कंपनीशी संबंध आला. दोन्ही आरोपींचा कंपनीशी संबंध आल्यानंतर मुख्यमंत्री विजयन यांनी कौन्सिल जनरलशी यूएईत जाऊन अनौपचारिक चर्चा केल्याची माहिती आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*