कलम ३७० हटविल्याने हिंदू शरणार्थी मुख्य प्रवाहात, जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करू करणार मतदान


भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आपले सर्वस्व सोडून भारतात आलेले तब्बल दीड लाख हिंदू शरणार्थी कलम ३७० हटविल्याने प्रथमच मुख्य प्रवाहात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडू मोदी-मोदी गजर करण्यात येत आहे.(jammu kashmir election)


वृत्तसंस्था

जम्मू : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आपले सर्वस्व सोडून भारतात आलेले तब्बल दीड लाख हिंदू शरणार्थी कलम ३७० हटविल्याने प्रथमच मुख्य प्रवाहात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडू मोदी-मोदी गजर करण्यात येत आहे.jammu kashmir election

कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमधील मुळ नागरिकांना संरक्षण देण्याच्या नावाखाली या दीड लाख शरणार्थींना नागरिकत्वाचे अधिकार नाकारले होते. त्यांना केवळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता येत होते. परंतु, राज्याची विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत मतदानाचा अधिकार नव्हता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना आता राजकीय अधिकार मिळणार आहेत. फाळणीच्या वेळी हजारो हिंदू शरणार्थी आपले सर्वस्व सोडून भारतात आले होते. त्यातील २२ हजार कुटुंबे जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झाली होती. त्यांची एकूण लोकसंख्या दीड लाखांहून अधिक आहे. भारतात त्यांची चौथी पिढी आहे. मात्र, तरीही त्यांना राजकीय अधिकार नव्हते.jammu kashmir election

कलम ३७० हटविले गेल्यानंतर होणार्या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार मिलणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त के. के. शर्मा यांनी सांगितले की पाकिस्तानातून आलेले निर्वासित आता मतदान करू शकणार आहेत. त्यांचे नाव मतदार यादीत नसले तरी आता लवकरच ते समाविष्ट करण्यात येणार आहे.

jammu kashmir election

निर्वासित संघटनेचे अध्यक्ष लब्बा राम गांधी यांनी सांगितले की गेल्या सात दशकांपासून आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आता आला आहे. नागरिकत्व मिळळ्याबरोबरच आता प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाल्यावर युवकांमध्ये उत्साह आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था