शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीत खडखडाट; अर्णबविरुद्ध लढायला लाखोंची उधळण

विशेष प्रतिनिधी

मुंबई/ नवी दिल्ली : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची म्हटले तर ठाकरे – पवार सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्राकडे हे दोन्ही नेते कटोरा घेऊन जात आहेत आणि दुसरीकडे स्वतःची तथाकथित प्रतिष्ठा जपण्यासाठी अर्णब गोस्वामीविरुद्ध कोर्टाची लढाई लढायला लाखो रुपयांची उधळण चालली आहे.

अर्णब गोस्वामी याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात ठाकरे – पवार सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांना प्रत्येक सुनावणीसाठी तब्बल १० लाख रुपये फी देण्याची मंजुरी ठाकरे – पवार सरकारच्या गृह खात्याने दिली आहे. एवढेच नाही तर सिब्बल यांचा असिस्टंट वकील राहुल चिटणीस यांना दर सुनावणीत उपस्थित राहण्यासाठी दीड लाख रुपयांची फी देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार ओल्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा दौरा केले आहेत. प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहेत. परंतु ठोस मदतीची आकडेवारी जाहीर करण्यात कचरले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे आता केंद्रानेच शेतकऱ्यांना मदत करावी, असा धोशा लावला आहे. या दोनही नेत्यांबरोबरच महाराष्ट्राचे पाऊण डझन मंत्री ओल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून आले त्यांनीही केंद्राकडे तोंड करून मदतीची मागणी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*