आदित्यसेनेमुळे ठाकरे सरकारचे हात दाखवून अवलक्षण, परीक्षांच्या निर्णयावरून तोंडावर पडण्याची वेळ


विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेतल्याच पाहिजे असे सांगितल्याने उध्दव ठाकरे सरकारवर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. आदित्यसेनेच्या दबावामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीशिवाय घेतलेला निर्णय चांगलाच अंगाशी आला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेतल्याच पाहिजे असे सांगितल्याने उध्दव ठाकरे सरकारला तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. आदित्यसेनेच्या दबावामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीशिवाय घेतलेला निर्णय चांगलाच अंगाशी आला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी चीनी व्हायसरच्या साथीतही युवकांचे राजकारण साधण्याचा प्रयत्न केला. अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली होती. नव्यानेच शिवसेनेत आलेले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही युवराजांना कुर्निसात करत परीक्षा होणार नसल्याचे जाहीर केले.

मात्र, आता विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा अनिवार्य असल्याचे सांगितल्याने राज्य सरकारला परीक्षा घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तीन महिने वाया गेले आहेत. परीक्षा होणार नसल्याचे सरकारनेच सांगितले असल्याने त्यांनी अभ्यास केलेला नाही.

राज्यातील चीनी व्हायरसची स्थिती बिघडत असताना उपाययोजनेचे मुख्य काम करण्यापेक्षा ठाकरे सरकारने परीक्षेच्या प्रश्नात राजकारण सुरू केले. त्यावरून विद्यापीठांचे कुलगुरू असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याही वाद ओढवून घेतला. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याची भूमिका घेतली असताना राज्य सरकार वेगळी भूमिका कशी घेते, असा सवाल राज्यपालांनी केला होता. पण त्याला राजकीय रंग दिला गेला.

शिक्षण हा विषय केंद्र व राज्य या दोघांच्या सामायिक सूचीत समाविष्ट (कॉंकरन्ट लिस्ट) होतो. शिक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा केंद्र व राज्य या दोघांनाही अधिकार आहे. राज्य सरकारने एखादा कायदा केला व त्याच अनुषंगाने संसदेने कायदा केल्यास, राज्याचा कायदा ग्राह्य धरला जात नाही. केंद्राने परीक्षा घेण्याची भूमिका घेतल्याने राज्यातही परीक्षा घ्याव्याच लागतील.

त्यामुळे वेळोवेळी फेसबुक लाईव्ह करणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही चुप्पी साधली आहे. युवासेनेचे पदाधिकारीही गप्प आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला आहे. परीक्षांचे भवितव्य काय यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था