आधी ३७० हटविले; आता काश्मीरमधील जमिनी विकणार म्हणून काश्मिरी तरुण शस्त्र उचलतील; मेहबूबा मुफ्तींचे हिंसाचाराला समर्थ

  • दहशतवादी कॅम्पमधील भरती वाढत असल्याचीही मखलाशी

वृत्तसंस्था

जम्मू : आधी जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटवले. आता तिथल्या जमिनी सर्व भारतभरच्या लोकांना विक्रीसाठी उपलब्ध केल्या म्हणून काश्मिरी तरुण शस्त्र उचलतील, असे अशा शब्दांत समर्थन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दहशतवादी हिंसाचाराचे समर्थन केले आहे. act 370 news

मेहबूबा यांनी पुन्हा एकदा कलम ३७० च्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, आज काश्मीर घाटीतील तरूणांकडे नोकरी नाही, त्यामुळे त्यांच्या समोर आता शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आज दहशतवादी कॅम्पमधील भरती वाढत आहे. act 370 news

भाजपा जम्मू-काश्मीरची जमिनीची विक्री करू इच्छित आहे. आज बाहेरून येऊन लोक इथे नोकरी करत आहेत. मात्र आपल्या मुलांना नोकरी मिळत नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्या सध्या जम्मू दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कलम ३७० वरून मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले की, हा मुस्लीम व हिंदुंचा विषय नाही. जम्मू-काश्मीर लोकांची ओळख आहे. लोकांना आपल्या भविष्याची चिंता आहे.

act 370 news

या अगोदर देखील मुफ्तींनी सातत्याने कलम ३७० वरून केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे. लोकांचा आवाज दाबून जम्मू काश्मीरमध्ये प्रेशर कुकरसारखी परिस्थिती निर्माण केली होती. एक वेळ अशी येईल जेव्हा सरकार हात जोडून विचारेल की राज्याला विशेष दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवे,” असे मुफ्ती म्हणाल्या होत्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*