१ अब्ज भारतीयांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून सबलीकरण

  • RAISE 2020 : कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी जागतिक परिषदेचे मोदी सरकारकडून आयोजन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापररातून १ अब्ज भारतीयांचे सबलीकरणचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. या विषयावरची जागतिक परिषद Responsible AI for Social Empowerment 2020 किंवा RAISE 2020 या नावाची ही शिखर परिषद आजपासून पाच दिवस चालणार आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांची मिळून या शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिषदेचं उद्घाटन होत आहे. व्हर्च्युअल पद्धतीने होणाऱ्या या परिषदेचं नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत, IBM चे अरविंद कृष्णा, राज रेड्डी आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहतील.

५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान हे व्हर्च्युअल समिट होईल. IT आणि उद्योग क्षेत्रातले नामवंत, भारत सरकारचे प्रतिनिधी, नीती आयोगाचे प्रतिनिधी आणि संशोधक, शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामाजिक भान ठेवून वापर केला तर त्यातून सबलीकरण कसं करता येईल. १ अब्ज भारतीयांना या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापराने सबलीकरण करता येईल, असे सांगितले जाते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*