संपूर्ण सियाचीन पाकिस्तानला देण्याचा “सोनिया – मनमोहन डाव” एम. के. नारायणन यांनी उधळला होता…!!


माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांच्या पुस्तकात धक्कादायक खुलासा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : “संपूर्ण सियाचीन पाकिस्तानला देण्याचा “सोनिया – मनमोहन डाव” माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी उधळला होता,” माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांच्या आगामी How India sees The World या पुस्तकात हा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याची माहिती आहे. भारताच्या सुरक्षेच्या हिताला काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी कसा चूड लावण्याचा प्रयत्न केला होता, याची “दुष्कर्म कहाणी”च श्याम सरन यांनी कथन केली आहे.

चीन विरोधात मोदी सरकारने आक्रमक भूमिका घेतल्यावरही राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाट्टेल त्या दुगाण्या झोडत आहेत. त्यांना “सरेंडर मोदी” म्हणत आहेत. पण त्यांच्याच काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या सुरक्षेचा कसा खेळ खंडोबा चालवला होता, हे परराष्ट्र सचिव पदावरील अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यानेच लिहिल्याने त्यांची पुरती “पोलखोल” झाली आहे.

यूपीए १ च्या वेळी सन २००६ पर्यंत श्याम सरन परराष्ट्र सचिव होते. सोनिया गांधी यांच्या संमतीने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सरन यांना सियाचीनसंबंधी पाकिस्तानशी चर्चा करायला सांगितले होते. सरन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव रियाज महंमद खान यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या. यातून सियाचीन deal संबंधी एक document तयार केले. संपूर्ण सियाचीन पाकिस्तानच्या सुपूर्द करण्याचे ते deal होते. पाकिस्तानला सियाचीन कायमचे देऊन सोनिया गांधी – डॉ. मनमोहन सिंग यांना पाकिस्तानशी संबंध कायमचे सुधारायचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी या deal मध्ये विशेष रस दाखविला होता.

संबंधित document तयार करताना सैन्य दलांना विचारात घेण्यात आले होते. त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल जे. जे. सिंग यांचा सुरवातीला या deal ला पाठिंबा होता. पण मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीत (CCS) मध्ये ज्या वेळी हा मुद्दा चर्चेला आला, त्यावेळी राष्ट्रीस सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी त्याला आक्षेप घेतला. सियाचीन भारताच्या सुरक्षा हितासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तेथील भारतीय चौक्या, positions अत्यंत मोक्याच्या जागी आहेत. पाकिस्तानवर वचक ठेवणाऱ्या आहेत. हे Deal करून सियाचीन पाकिस्तानला सोपविणे धोकादायक ठरेल. एवढे करूनही पाकिस्तानचे समाधान होणे कठीण आहे. पाकिस्तानवर विश्वास ठेवणेही कठीण आहे, अशा परखड शब्दांमध्ये नारायणन यांनी या deal ची निर्भत्सना केली. नारायणन यांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन जनरल जे. जे. सिंग सुद्धा बदलले. त्यांनी आधीची भूमिका फिरवून नारायणन यांना दुजोरा दिला. त्यावेळी बैठकीत हजर असलेले गृहमंत्री शिवराज पाटील आणि संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी हे नेते गप्प बसले होते.

सियाचीनचा मुद्दा भारत – पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेत सुद्धा घेता कामा नये, असे नारायणन यांनी सांगितले त्यावेळी सियाचीनचा मुद्दा भारत – पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेत समाविष्ट करायला राजीव गांधींनी संमती दिली होती, ही बाब प्रणव मुखर्जी यांनी लक्षात आणून दिली. पण त्या बैठकीत एकूण फिरलेला “मूड” लक्षात घेऊन नंतर सियाचीन पाकिस्तानला द्यायचे हे deal गुंडाळण्यात आल्याचे सरन यांनी पुस्तकात स्पष्ट केले आहे.

विकिलीक्स काही महिन्यांपूर्वी याच प्रकरणाला वाचा फोडली होती. पण त्यावेळी काँग्रेसने fake news म्हणून हात झटकले होते. आता मात्र श्याम सरन यांच्या सारख्या deal च्या वाटाघाटींमध्ये प्रत्यक्ष सामील असणाऱ्या व्यक्तीनेच या प्रकरणी सविस्त लिहून काँग्रेसच्या नेत्यांना expose केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था