- बँकिंग क्षेत्र सध्या उत्तम स्थितीत; शक्तिकांत दास यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावे लागणार असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले.
कोरोना महामारीनंतर आता अर्थव्यवस्थेला पुन्हा एका मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावे लागणार आहे. आर्थिक क्षेत्रालाही आता सामान्य स्थितीत आणावे लागणार असल्याचे शक्तीकांत दास यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपययोजना लवकरच हटवल्या जातील असे कोणीही समजू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. बँकिंग क्षेत्र सध्या उत्तम स्थितीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनीकरण एक योग्य दिशेत उचलण्यात आलेलं पाऊल आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करत मार्गावर आणण्यासाठी दक्षताही बाळगणं तितकच महत्त्वाचं असल्याचे त्यांनी नमूद केलं.
I am quite pleased to say that the Indian banking sector continues to be safe and stable: RBI Governor Shaktikanta Das (in file pic) today at a newspaper event pic.twitter.com/e2A1BkoDoO
— ANI (@ANI) August 27, 2020
While the moratorium on loans was a temporary solution in the context of lockdown, resolution framework is expected to give a durable relief to borrowers facing COVID19 related stress: RBI Governor Shaktikanta Das (in file pic) at a newspaper event, today pic.twitter.com/j1pedJT9zk
— ANI (@ANI) August 27, 2020
“बँकांना सद्यस्थितीत आव्हानांचा सामना करावा लागेल हे स्पष्ट आहे. परंतु बँका या आव्हांनांना कसा प्रतिसाद आणि तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. देशातील करोना महामारीचा प्रकोप आणि त्याच्या अन्य बाबींवर स्पष्टता आल्यानंतर रिझर्व्ह बँक महागाई आणि आर्थिक वद्धीबाबत आपला अंदाज वर्तवणार आहे,” असंही दास यांनी स्पष्ट केलं.
“कर्ज देण्यात गरजेपेक्षा अधिक सतर्कता बाळगण्यानं बँकांनाच अधिक नुकसान होणार आहे आणि मूलभूत कामं नं केल्यानं बँकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. जोखीम पत्करण्यापासून बचाव करण्याऐवजी बँकांनी आपल्या रिक्स मॅनेजमेंट आणि गव्हर्नंन्स फ्रेमवर्कला अधिक सक्षम केले पाहिजे,” असेही दास म्हणाले.