वृत्तसंस्था
मुंबई : अनुराग सातत्याने काहीतरी नवं “धाडस” करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून अनुराग आणि त्याचा मित्र कुणाल कामरा गेले होते अर्णब गोस्वामीला भेटायला गेले होते, “चप्पलभेट” घेऊन. अखेर लिबरल्सनी “सहिष्णू संस्कृती”चा प्रत्यय आणून दिला. अनुराग कश्यप आपल्या सिनेमांमुळे खूपच प्रसिद्ध झाला.
अनुराग सातत्याने काहीतरी नवं “धाडस” करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून अनुराग आणि त्याचा मित्र कुणाल कामरा गेले होते अर्णब गोस्वामीला भेटायला गेले होते. अनेकांना खोटं वाटेल पण असं खरंच झालं होतं. आणि याचा पुरावाही आहे म्हणूनच लोकांना त्याची खात्री पटेल. अनुराग कश्यप, कुणाल कामरासारखे काही जण त्यापलिकडे जाऊन आपला पवित्रा घेतात.
कुणालने भर विमानात अर्णब गोस्वामींवर टीका टिप्पणी केली होती. त्यात अनुरागचीही भर पडली. अनुराग नेहमीच ट्विटरवरून आपली भूमिका घेत असतो. आता अशी दोन मंडळी “एकत्र” आली होती.
गुरूवारी अनुरागचा वाढदिवस. त्याला शुभेच्छा देताना कुणाल कामराने अनुराग कश्यपसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत अनुराग तर आहेच. पण दोघांच्याही हातात फोटो फ्रेम आहेत. आणि या फ्रेममध्ये आहे चक्क चप्पल.
थेट चप्पल फ्रेम करून “भेट” देण्याची तयारी या दोघांनी चालवली. पण त्या दोघांना गेटवर थांबवण्यात आलं. आणि अपॉइंटमेंट शिवाय आत सोडलं जात नसल्याचं सांगितलं गेलं. वारंवार सांगूनही सुरक्षा रक्षकाने काही त्यांना चॅनलच्या कार्यालयात जाऊ दिलं नाही. मग दोघांनीही खालच्या खालीच एक फोटो काढला होता. तोच फोटो कुणालने इन्स्टावर टाकला.
रिपब्लिकच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्वोत्कृष्ट पत्रकारितेचं पारितोषिक आम्हाला अर्णबला द्यायचं होतं. पण आम्हाला वर सोडलं नाही. म्हणून आम्ही खालच्याखालीच निघालो. असं इन्स्टावर टाकून कुणालने सांगितलंय. अनुरागच्या वाढदिवसानिमित्त त्याने ही पोस्ट टाकली होती.