बाळासाहेबांसोबतचा फोटो पोस्ट करत सुमीत राघवनने संजय राऊतांची “काढली”

  • “मी मराठी नाही, तरी मराठी रंगभूमीवर उत्तम काम करतो… मग मी दुष्मन का? मुंबई कोणाच्या बापाची नाही”

वृत्तसंस्था

मुंबई : “मुंबई मराठी माणसाच्या बापाची”, असे कंगनाला ठणकावणाऱ्या संजय राऊतांची सवाई ट्विट करून अभिनेता सुमीत राघवनने “काढली” आहे.

संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर कंगनावर जोरदार टीका झाली. कंगनाने अजून एक ट्विट करत धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिले. आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असे कंगनाने म्हटले. त्यावर संजय राऊत आक्रमक ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे म्हणत ट्विट केले. त्यांच्या या ट्विटवर अभिनेता सुमीत राघवनने पोस्ट करत सवाल उपस्थित केला आहे.

सुमीतने पोस्टमध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत संजय राऊत यांना त्यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. “सर, माझे बाबा मराठी माणूस नाहीत, मीही नाही. पण माझा जन्म इथेच झाला. मी इतरांपेक्षा चांगले मराठी बोलू शकतो. गेल्या ३० वर्षांपासून मी मराठी रंगभूमीवर काम करत आहे. माझी मुले मराठी शाळेत शिकली. मी म्हणतो मुंबई कोणाच्या बापाची नाहीए. मग मी दुष्मन झालो का? अतिशय चुकीचे विधान आहे तुमचे”, असे सुमीतने पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे.. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा.. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सुमीत राघवनने या ट्विटलाच सवाई ट्विट करून उत्तर दिले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*