पालघर सेक्युलर लिंचिंग प्रकरणी तत्कालीन प्रभारी अधिकारी बडतर्फ

  • तीन पोलिसांवरही बडतर्फीची कारवाई

वृत्तसंस्था

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या सेक्युलर लिचिंग प्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे आणि तीन पोलिसांना पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आले आहे.

१६ एप्रिल २०२० रोजी झालेल्या या हत्याकांडात मुंबईहून सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रथम कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर.बी साळुंखे व दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते, तर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

हे प्रकरण घडल्यानंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.

गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत असून कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*