दिल्ली-मुंबई बाईकवर ११ तासांत शक्य…!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : केंद्र सरकारच्या सडक व परिवहन मंत्रालयातर्फे उभारण्यात येत असलेल्या दिल्ली ते मुंबई ग्रीनफिल्ड महामार्ग या महत्वाकांक्षी एक्सप्रेसवरून मोटारसायकलस्वार हा कमीत कमी अकरा तासात पोहचेल, अशक्य वाटतंय, विश्वास नाही बसत नाही,पण हे खरं होणार आहे, या नव्या मार्गाविषयीचे पाच मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे.

एखाद्या मोटारसायकलस्वाराने दिल्ली ते मुंबईत मोटारसायकलने १२० कि.मि.प्रती वेगाने अकरा तासात पोहचावे असा हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(न्हाई)चा महत्वाकाक्षी प्रकल्प म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. अर्थात त्यासाठी निर्माण केलेल्या स्पेशल परपर्ज व्हेईकन(एसपीव्ही) कंपनीच्या च्या माध्यमातून आर्थिक बाजू भक्कम करत व सहकार्याशिवाय ही उभारणी अशक्यच आहे.

दिल्ली-मुंबई ग्रीनफिल्ड महामार्गाबाबतच्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे.

  • हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्च २०२४ पर्यत पुर्णत्वास येईल
  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे ची लांबी १हजार २७५ कि.मी आहे. सध्या आठ लेनमध्ये यांची रचना असेल पण भविष्यातील गरज लक्षात घेऊन तो १२ लेनपर्यत पुढे वाढवता येईल. भारतातील हा सर्वात लांबलचक ग्रीनफिल्ड महामार्ग असून ताशी १२० च्या गतीने त्यावरून जाता येईल.
  • भारतमाला परियोजनेच्या पहिल्या चरणांतर्गत या महामार्गाचे काम चालणार असून दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे कॉरीडॉर हा समुह संकल्पनेतून उभारला जाणार महत्वाचा प्रकल्प आहे.
  • महामार्गावर सामान्यतः चार लेन असतात, यातील दोन येण्याच्या रस्त्याने आणि दोन जाण्याच्या रस्त्यासाठी असतात. या महामार्गावर ७५ ठिकाणी विविध अद्यावत सुविधा पुरविल्या जाणार आहे. साधारणतः ५० किलोमिटरच्या अंतरावर याची व्यवस्था केलेली असेल. या प्रकल्पासाठी लागणारे भांडवल हे ८२.५१४ कोटी इतके निश्चित करण्यात आले असून त्यात  भूसंपादनासाठी २०,९२८ कोटी रूपयांचा समावेश आहे,.