दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घ्या, संभाजीराजे यांची राज्यपालांकडे मागणी

वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कौतुक करत दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घ्या, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कौतुक करत दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घ्या, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, राज्यपालांना माझी एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या ध्येयवादाने रायगडावर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल. स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन मोहिमेत सरकारने शिवप्रेमींना सहकार्य करून पाठिंबा द्यावा ही अपेक्षा नेहमीच केली गेली. त्यामुळे राज्यपालांनी प्रत्येक मंत्र्यांना गड दत्तक घेण्याची केलेली सूचना अत्यंत योग्य असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ व्या वषीर्ही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांचा फिटनेस पाहून या भेटीदरम्यान उपस्थित असलेले इतर अधिकारीही अवाक झाले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*