‘ते’ बाॅर्डरवर गेले; ‘हे’ मंत्रालयात कधी जाणार..? रामदास फुटाणेंच्या वात्रटिकेने दाखविला ‘मातोश्री’बाहेर न पडलेल्या उद्धव ठाकरेंना ‘आरसा’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच आरसा दाखविला. चायनीज व्हायरसची सर्वाधिक बाधा महाराष्ट्राला झाली असली आणि रूग्ण संख्या दोन लाखांच्यापुढे गेली असली तर मुख्यमंत्री ठाकरे अद्यापपर्यंत ‘मातोश्री’बाहेर पडलेले नाहीत, एकाही रूग्णालयात भेट द्यायला गेलेले नाहीत. याउलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास राज्याचा दौरा केला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील काही ठिकाणी भेटीदिलेल्या आहेत. तसेच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला भेट देऊन जवानांचे मनोधैर्यदेखील वाढविलेले आहे.

या पार्श्वभूमीवर फुटाणे यांनी ठाकरे यांना चांगलेच बोचकारे काढले आहेत. त्यांनी लिहिलंय…

‘ते बाॅर्डरवर गेले’

सैनिकांचे मनोधैर्य वाढले

‘हे मंत्रालयात कधी जाणार?’

जाणारच आहेत.

निश्चितच जातील.

शिवबाचे मावळे आहेत.

जाणारच.

‘कधी?’

लिफ्ट मोठी झाल्यावर

कशासाठी?

सहाव्या माळ्यावर

कार जात नाही…


    Leave Your Comment

    Your email address will not be published.*