जीडीपी घसरणीच्या तुलनेतली तफावत सांगते खरी कहाणी

  • लॉकडाऊन ‘काळ’; देशाचा जीडीपी गडगडला; पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी – २३.९%
  • प्रत्यक्षात “समान वार्षिक तिमाही” निकषांवरील तुलनेत आकडा – ९.३%

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेला मोठा तडाखा दिला. चालू वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल – जून) सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा दर नकारात्मक राहिला. या काळात जीडीपीत – २३.९% एवढी प्रचंड घसरण झाल्याची नोंद झाली. गेल्या तिमाहीत जीडीपीत ३.१% वाढ झाली होती. गतवर्षी समान तिमाहीत ५.२% वाढ झाली हाेती.

 

परंतु, जीडीपी तुलना जगातील इतर देश आणि भारत यांच्यात वेगवेगळी केली जात असल्याची वस्तुस्थिती कोणी मांडत नाही. भारतात ही तुलना “समान वार्षिक – तिमाही” या स्वरूपाची असते तर जगात ही तुलना आधीच्या वर्षातील शेवटच्या तिमाहीशी चालू वर्षातील पहिल्या तिमाहीशी केली जाते. भारतात नोंदला गेलेला – २३.९% हा अर्थव्यवस्थेचा वाढीचा आकडा जगातील इतर देशांच्या पद्धतीनुसार नोंदविला गेल्याने मोठा दिसतो. प्रत्यक्षात भारतीय पद्धतीने “समान वार्षिक तिमाही”नुसार आर्थिक विकास दरवाढीची तुलना केली तर हाच दर – ९.३% एवढा खाली येतो. ही यातली खरी मेख आहे.

आणि याच निकषावर जगातील प्रगत देशांचा जीडीपी विकास दर मोजायचा झाला तर तो भारतापेक्षा खाली गेलेला दिसेल. उदा. अमेरिका – ३२.९%, जपान – २८.३%, जर्मनी – ३४.७% आणि भारत – २३.९% असा राहतो. मग भारताचा जीडीपी विकास दर जगाच्याही तुलनेत बराच कमी घसरल्याचेही दिसते.

 

जीडीपीची तिमाही आकडेवारी १९९६ पासून जारी होत आहे. त्यानंतर २४ वर्षांत कोणत्याही तिमाहीत जीडीपीतील ही सर्वात मोठी घसरण आहे, असे सांगितले जात असले तरी तुलनात्मक आकड्यात मोठी तफावत दिसून येते आहे. लाॅकडाऊनमुळे अर्थतज्ज्ञ आधीपासूनच अर्थव्यवस्थेत – १८% पर्यंत घसरणीचा अंदाज वर्तवत होते. अर्थतज्ज्ञ सुजन हाजरा म्हणाले, कृषी क्षेत्राने अपेक्षेनुसार उत्तम कामगिरी केली आहे. वित्तीय सेवा व युटिलिटी क्षेत्राची कामगिरी संतोषजनक आहे. यात फक्त ५.३ व ७% घसरण झाल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली आहे.

 

नकारात्मक वाढ राहिली तर देशात मंदी

  • मात्र पुढील तिमाहीतही वृद्धिदर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक राहिला तर देश अधिकृतरीत्या मंदीच्या तडाख्यात असल्याचे समजले जाईल. साधारणत: सलग दोन तिमाहीत जीडीपी दर नकारात्मक राहिल्यास मंदी आल्याचे मानले जाते.
  • जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांकडे पाहता भारतात सर्वात मोठी घसरण झाली आहे, असे मानले जात असले तरी तुलनेच्या तफवतीमुळे हा आकडा मोठा दिसतो आहे. पण अमेरिका, जपान, जर्मनीच्या तुलनेत कमी आणि ब्रिटनपेक्षा अधिक दिसतो आहे.
  • भारतातील इतक्या मोठ्या घसरणीकडे पाहता वर्षभर अर्थव्यवस्था निगेटिव्ह झोनमध्ये राहण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
  • पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीला कृषी क्षेत्राकडून सर्वात मोठा आधार मिळाला आहे. या क्षेत्रात ३.४% विकास झाला. ही आकडेवारी गेल्या वर्षापेक्षाही चांगली आहे.

सर्वात मोठी घसरण, रुग्णांतही सर्वाधिक वाढ

जगातील इतर प्रमुख देशांच्या तुलनेत भारतात सर्वात मोठी आर्थिक घसरण झाली आहे. भारतातच सर्वाधिक संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

 

कृषी विकास दर 3.4%

 

आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीत मायनिंग क्षेत्राची वाढ २३.३ घसरली आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ४.७% घसरण झाली होती.त्याचप्रमाणे उत्पादन क्षेत्रातही ३% तुलनेत ३९.३% घट झाली आहे.या कालावधीत शेतीचा विकास दर ४.४% आहे.बांधकाम क्षेत्राचा विकास दर ५०.२% टक्क्यांनी घसरला आहे. एका वर्षाच्या आधीच्या याच तिमाहीत यात ५.३% टक्के वाढ नोंदली गेली.

 

व्याज दर कपातीस स्थगिती देऊ शकते

 

आकडेवारीनुसार व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रातील विकास दर ४७% टक्क्यांनी घसरला आहे. विजेमध्ये ७% घट झाली आहे. या आकडेवारीनंतर विश्लेषकांचे मत आहे की रिझर्व्ह बँक व्याजदरामधील कपात डिसेंबरपर्यंत पुढे ढकलू शकते.

 

वर्षभरापूर्वी जीडीपी विकास दर ५%

 

आर्थिक वर्ष २०१९ – २० च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीची वाढ ३.१% टक्के होती, तर दुसऱ्या तिमाहीत ४.५% टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ४.७% होती. तसेच, एका वर्षापूर्वीच्या पहिल्या तिमाहीत ५% टक्के वाढ झाली. यापूर्वीच 20 टक्के घट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती

 

जीडीपी म्हणजे काय?

एका वर्षात देशात उत्पादित होणार्‍या सर्व वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला जीडीपी म्हणतात. जीडीपी कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवते. यावरून देशाचा विकास कसा होतो हे दिसून येते. एनएसओ दर तिमाहीत जीडीपी आकडेवारी जाहीर करते, म्हणजे वर्षातून चार वेळा. याची गणना कंजम्पशन एक्सपेंडिचर, गवर्नमेंट एक्सपेंडिचर, इनवेस्टमेंट एक्सपेंडिचर आणि नेट एक्सपोर्ट्सद्वारे होते.

 

जीडीपीमध्ये या क्षेत्रांचा समावेश आहे

 

यासाठी, आठ प्रमुख क्षेत्रांमधून आकडेवारी घेण्यात येते. यामध्ये शेती, रिअल इस्टेट, उत्पादन, वीज, गॅस पुरवठा, खाण, हॉटेल, बांधकाम, व्यापार आणि दळणवळण, वित्तपुरवठा आणि विमा, व्यवसाय सेवा, समुदाय, सामाजिक आणि सार्वजनिक सेवांचा समावेश आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*