जनतेने नाकारलेले ‘राजघराणे’ म्हणजे विरोधी पक्ष नव्हे; नड्डांचा काँग्रेसला टोला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विशिष्ट राजघराणे म्हणजेच विरोधी पक्ष आहे आणि त्यांचे हित म्हणजेत देशहित असा भ्रम राजघराण्याच्या दरबारी खुशमस्कऱ्यांना वाटत असला तरी जनतेने त्यांना सातत्याने नाकारले आहे. त्यामुळे राजकुमाराला लाँच करण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागेल, असा सणसणीत टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसला लगाविला आहे.

भारत – चीन सीमाप्रश्नी काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी हे दररोज केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ले चढवित आहेत. नड्ड् यांनी राहुल गांधींच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे चित्र आहे.

देशातील एक राजघराणे म्हणजेच संपूर्ण विरोधी पक्ष आणि त्या राजघराण्याचे हित म्हणजेच देशाचे हित असा समज राजघराण्याच्या दरबारी खुशमस्कऱ्यांचा आहे. त्यामुळे राजघराण्याने आपले नखरे दाखविल्यानंतर त्याचा इमानेइतबारे प्रचार करण्याचे काम दरबारी खुशमस्करे अगदी आवडीने करीत असतात. मात्र, देशातील जनतेने सातत्याने नाकारलेले राजघराणे कधीही संपूर्ण विरोधी पक्ष ठरू शकत नाही. आज संपूर्ण देश सैन्यासोबत ठामपणे उभा असतानाही त्यांच्याबद्दल संशय निर्माण करून राजकुमाराचे लाँचिंग करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्यासाठी आणखी बराच काळ वाट पहावी लागणार आहे, असे सणसणीत प्रत्युत्तर नड्डा यांनी दिले आहे.

एका राजघराण्याच्या कारनाम्यांमुळे आपली हजारो एकर भूमी गमवावी लागली आहे. सिचाचिन ग्लेशियरदेखील जवळपास हातातून गेलेच होते. अशा भरपूर घटना आहेत. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले, यात काहीही आश्चर्य नाही सरकारला प्रश्न विचारण्याचा हक्क विरोधी पक्षांना आहे. सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी प्रश्न विचारले, काही सुचनाही केल्या. त्याचप्रमाणे पुढील धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारला पाठिंबादेखील दिला. मात्र, त्यात केवळ एका कुटुंबाचा अपवाद होता, ते कोण हे तुम्हाला ठाऊक असेलच, असा टोलाही नड्डा यांनी लगाविला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था