विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडला भारतीयांनी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशविदेशात मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावापोटी १०३ कोटी एवढी मोठी रक्कम आणि स्वखर्चातील निधी या फंडासाठछी दिला आहे. यातून नमामी गंगे मिशन आणि कन्या छात्रालयाच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यासाठी उपयोग होणार आहे. पंतप्रधान मोदींनी 27 मार्चला पीएम केअर्स फंडाची स्थापना केल्यानंतर सर्वात आधी 2.25 लाखांचा निधी दिला.
पंतप्रधान केअर 2019 -2020 च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात पंतप्रधान मोदींनी 2.25 लाखांचा निधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पीएम केअर्स निधीला स्थापनेपासून केवळ पाच दिवसांमध्ये 3076.62 कोटी रुपये ऐच्छिक देणगीच्या रुपात जमा झाल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
आपत्तकालीन परिस्थितीत पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत निधी) या न्यासाद्वारे सुरवातीच्या काळात (२७ मार्च) ही साखळी रोखण्यासाठी आपल्या निधीतून २. २५ लाखांची भरीव अशी मदत करण्यात आली होती. याशिवाय स्वयंसेवकांच्या सहाय्यतेतून ३.०७६ कोटी रूपयांची उभारणी पुढील पाच दिवसात करण्यात आली. त्यांचा कोरोनाच्यासंदर्भातील रूग्णांच्या उपचारासांठी पुढे फायदा झाला. असे पीएम केअर्सचा लेखा परिक्षण अहवालातून(२०१९-२०) पुढे आले आहे,
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या वैयक्तीक बचतीतून जवळपास २१ लाखांची रक्कम ही पीएम केअर्स न्यासासाठी दिली. या निधीचा वापर २०१९ मध्ये कुंभमेळ्यातील साफसफाई-स्वच्छतेसाठी केला होता. दक्षिण कोरीया(सेऊल)कडून मिळालेल्या शांततेच्या पुरस्काराची १.३ कोटी रूपयांची रक्कमही पंतप्रधान मोदी यांनी नमामी गंगेच्या पहिल्या टप्प्यासाठी देणगी म्हणून दिली होती. या काढण्यात येणाऱ्या रक्कमेला आयकरांतून सवलत मिळावी,याठीचे पत्रही त्यांनी त्यावेळी अर्थमंत्र्यांना लिहीले होते.
वस्तूच्या लिलावातून मदत
भेटवस्तू,बक्षिसे,स्मृतिचिन्हाच्या रूपाने मिळणाऱ्या बाबींचा लिलाव करून त्याद्वारे आलेली रक्कमही नमामी गंगेच्या मिशनसाठी दिली होती. त्यात ३.३ कोटी हे अलिकडच्या लिलावातून तर ८.३५ कोटी हे २०१५ ला सुरतला झालेल्या भेटवस्तूच्या लिलावातू प्राप्त झाले होते.
मुलीच्या शिक्षणासाठी मदत
याशिवाय पंतप्रधानांनी २०१४ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आपल्या वैयक्तीक खात्यातील २१ लाखांची रक्कम ही राज्य सरकारमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देणगी स्वरूपात दिले होते.
गुजरातचे पंतप्रधान असतांना भेटवस्तूच्या लिलावातून उभारलेला ८९.९६ कोटींचा निधी हा त्यांनी कन्या केलावणी निधीसाठी देणगी स्वरूपात दिला होता अर्थात तो मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येत आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला. त्यात २.४९ कोटीच्या निधीत १.२७ कोटी हे गांधीनगर एसबीआय बॅकेच्या शाखेत कायम मुदतठेव(फिक्स डिपॉझीट) केलेले होते आणि गांधीनगरच्या १.१० कोटी रूपयांच्या घरांचा समावेश आहे. या बाबी ठळकपणे नमूद केल्या आहेत. असे लेखापरिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.