किसान ट्रेनच्या चौकशीसाठी नगर, उत्तर महाराष्ट्रातून शेतकरी, व्यापाऱ्यांची गर्दी

विशेष प्रतिनिधी

नाशिक : किसान रेल्वेमुळे सध्या नाशिक जिल्ह्याच्या कृषी विकासाला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर द्राक्ष, कांदा, बेदाणे, खते, किटकनाशके ,तांदूळ, गहू,डाळींब, पालेभाज्या यांना हायटेक बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन विकणे सुकर झाले आहे.या ट्रेनच्या चौकशीसाठी नगर,उत्तर महाराष्ट्रातून शेतकरी,व्यापाऱ्यांची गर्दी वाढू लागली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनंदिन बाजारपेठेत विकला जाणारा भाजीपाला आता दूर अंतरावर पाठवला जात असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मालाला हायटेक बाजारपेठ मिळत आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील पालेभाज्या निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांनाही किसान ट्रेनचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.

मालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यात रेल्वेची महत्वपूर्ण भूमिका

जलद आणि स्वस्त वाहतुकीसह चांगल्या किमतीच्या आश्वासनासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे. विनाव्यत्यय शेती उत्पादनांचा नाश रोखून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची संधी या किसान ट्रेनमुळे खुली होत आहे. देवळाली ते मुझफ्फरपुर व इतर बागांपर्यत किसान रेल्वेने पत्ताकोबी, फुलकोबी, कोथिंबिर,  पालक, शेपू, मेथी, मिक्स भाज्या, मिरची,कांदे लसून या शेती उत्पादनांसह एकूण २३५.४४ टन मालाची महाराष्ट्रातून तिसऱ्या फेरीपर्यत वाहतूक केली आहे. शेतकरी बांधव किसान रेलच्या आधी रस्ते वाहतूकीवर अवलंबून होते. यातून काहीवेळा माल सोडला जायचा किंवा नाशवंत व्हायचा,मात्र या ट्रेनमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने मालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यात रेल्वेची महत्वपूर्ण भूमिका आहे.

देवळाली मुझफ्फरपूर येथून किसान विशेष रेल्वे या गाडीचे अनेक स्थानकांवर थांबे असून देशभरातील विविध राज्यातील शेतकऱ्यांना समृध्दी मिळत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव,मनमाड,नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शेतकरी व व्यापारी चौकशीसाठी गर्दी करत किसान ट्रेनमुळे नाशिकच्या कृषी विकासाला चालना मिळत आहे. शेतकऱ्यांना एकावेळी माल पाठवणे सोयीचे झाल्यामुळे एकूणच शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणार आहे. विशेष करून नाशिक जिल्ह्यात पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या,फळे देशभरात वितरण होण्यासाठी किसान रेल्व ही विकासाची जीवनवाहिनी ठरणार आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव,मनमाड,नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शेतकरी व व्यापारी चौकशीसाठी गर्दी करत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*