उत्तर प्रदेशात मजूर, कामगारांसाठी स्थानिक पातळीवर सव्वा कोटी रोजगार

उत्तर प्रदेश आत्मनिर्भर रोजगार अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते सुरवात


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली / लखनौ : कोरोना संकटकाळात थांबलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानातंर्गत उत्तर प्रदेशात सव्वा कोटी रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील मजूर, कामगारांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतली आहे. विडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले. राज्यातले मजूर, कामगार अन्य प्रगत राज्यांमध्ये जातात. त्यांना राज्यातच स्थानिक पातळीवर रोजगार देण्यासाठी विविध कार्यक्षेत्रांमध्ये काम सुरू आहे. मनरेगा आणि स्थानिक योजनांच्या माध्यमातून हे रोजगार देण्यात येत आहेत. कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेले ३५ लाख मजूर, कामगार विविध प्रगत राज्यांमधून उत्तर प्रदेशात परत आले. त्यापैकी ३० लाख मजूर, कामगारांचे skill mapping करण्यात आले.

या वेळी पंतप्रधानांनी रोजगार योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधला. एका व्यक्तीने अनेकांना रोजगार दिल्याचे अनुभव अनेकांनी मोदी यांच्याशी शेअर केले. उत्तर प्रदेशासारख्या योजनांमध्ये अन्य राज्यांनी देखील पुढाकार घ्यावा यातून प्रत्येक राज्यात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीबरोबरच रोजगार वाढण्यातही मदत होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, “उत्तर प्रदेशाची लोकसंख्या २४ कोटी आहे. युरोपातील चार देशांच्या बरोबरीची ही संख्या आहे. तेथे कोरोनामुळे अधिक मृत्यू झाले. उत्तर प्रदेश सरकार, जनता कोरोना रोखण्यात यशस्वी झाले. अमेरिकेतही असे यश मिळवले आहे. राज्य सरकार ८५ हजार नागरिकांचे जीव वाचविण्यात यश मिळाले आहे. पं. नेहरूंच्या काळात प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूचा आकडा लपवून ठेवला होता. मात्र योगी सरकारने कोरोना संकटाचे गांभीर्य ओळखले. त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला केला. प्रत्येक क्षेत्रात बारकाईने नियोजन करून राज्यातील जनतेचे हाल कमी केले. प्रगत देशांच्या तुलनेत अत्यंत प्रशंसनीय काम केले.”

मोदी म्हणाले, “केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून ६० लाख लोकांना मनरेगा व अन्य ग्रामीण रोजगार योजनेतून रोजगार मिळतोय. ४० लाख मजूर, कामगारांना MSME मध्ये काम मिळतेय. कौशल्य असणाऱ्या मजूर, कामगारांना ग्रामीण कलाक्षेत्रात काम मिळतेय. कापड, शिल्पकला, लेदर यात रोजगार आणि स्वयंरोजगार मिळतोय.”

याच रोजगार योजनांमधून शेतकऱ्यांना तसेच पशूपालकांना लाभ मिळणार आहे. पशूपालकांना डेअरी सेक्टरला जोडून घ्यायचे आहे. यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे पँकेज सरकारने जाहीर केले आहे. बौद्ध तीर्थयात्रा क्षेत्र विकासासाठी कुशीनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*