आनंदाची बातमी… कोरोनावरील भारतीय लस १५ ऑगस्टपर्यंत येणार !

विशेष प्रतिनिधी

 

नवी दिल्ली कोरोना संक्रमणाच्या नकारात्मक वातावरणात एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार भारत बायोटेकतर्फे तयार होत असलेली कोरोनाची भारतीय लस १५ ऑगस्टपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे.

संपूर्ण जगास वेठीस धरणाऱ्या कोरोना अर्थात चिनी विषाणूने संपूर्ण जगास वेठीस धरले आहे. कोरोनावरील लसीसंदर्भात जगातील अनेक देश संशोधन करीत आहेत, जगभरात सध्या सुमारे १०० लसींवर संशोधन सुरू आहे. भारतही त्यात मागे नाही, भारतात भारत बायोटेकतर्फेल ‘कोवॅक्सिन’ या कोरोना लसीचे संशोधन सुरू आहे. सदर संशोधन आता अंतिम टप्प्यात असून येत्या ७ जुलैपासून लसीच्या मानवी चाचणीस प्रारंभ होणार आहे.

लसीची मानवी चाचणी दोन टप्प्यांमध्ये होणार आहे, त्यासाठी देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांची निवड करण्यात आली आहे. आयसीएमआरपचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी भारत बायोटेकला त्यासंदर्भात पत्र लिहीले आहे. लसीच्या चाचण्या सकारात्मक आल्यास १५ ऑगस्ट रोजी लसी नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक त्या चाचण्या निर्धारित वेळेत पूर्ण करणे गरजेचे असून त्यासाठी सर्व वैद्यकीय संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही वेगात पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात देशवासियांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*