अयोध्येच्या अत्याधुनिक विकासाची ब्ल्यू प्रिंट, विकास प्राधीकरणात ८७ हजारांहून अधिक क्षेत्राचा समावेश

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य मंदिराबरोबरच येथील अर्थकारणही बदलेल अशा प्रकारे विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे अयोध्येच्या अत्याधुनिक विकासाची ब्ल्यू प्रिंट बनली आहे.


वृत्तसंस्था

अयोध्या: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य मंदिराबरोबरच येथील अर्थकारणही बदलेल अशा प्रकारे विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे अयोध्येच्या अत्याधुनिक विकासाची ब्ल्यू प्रिंट बनली आहे.

अयोध्या विकास प्राधीकरणाचे क्षेत्र १३८ पट वाढविण्यात आले असून ८७ हजार हेक्टरवरून अधिक क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाची जबाबदारी पंतप्रधानांनी आपले निकटवर्तीय माजी अधिकारी नृपेंद्र मिश्र यांच्याकडे सोपविली आहे. तेच श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आहेत. विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन ते सोमवारी अयोध्येला भेट देणार आहेत.

राममंदिराच्या पायाभरणीची तयारी करण्याबरोबरच येथील विकासाला चालना देण्यासाठी विविध योजना घेऊन ते जाणार आहेत. पंतप्रधानांनी भूमिपूजन कार्यक्रमानंतर दिल्लीला पोहोचल्यावर विविध एजन्सीची नियुक्ती केली होती. अनेक प्रकारचे सर्व्हे करण्यता आले. त्यानुसार अयोध्या विकास प्राधीकरणामध्ये आता अयोध्येसह गोंडा-बस्ती जिल्ह्याचा भाग मिळून सुमारे ८७ हजार २८१ हेक्टरचा भाग समाविष्ट असेल. यात अयोध्या व नजिकची भदरसा नगर पंचायत आणि १५५ गावे, गोंडा जिल्ह्यातील नवाबगंज नगरपालिका आणि ६२ गावे आणि बस्ती जिल्ह्यातील ९० गावे असणार आहेत.

अयोध्येमध्ये भविष्यात पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये शासकीय निधीपेक्षा जास्त सीएसआर निधीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी अनेक उद्योजक घराण्यांनी तयारी दर्शविली आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास ते तयार आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*