अजित पवार म्हणतात, “१२५ कोटी जनतेने चीनी माल घेणे बंद केले तर चीन वठणीवर येईल”


  • मग चीनी कंपन्यांशी सामंजस्य करार स्थगितीवर महाराष्ट्र सरकारचे घुमजाव का?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : १२५ भारतीयांनी चीनी माल घेणे बंद केले तर चीन जागेवर येईल, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी व्यक्त केले. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते. मात्र महाराष्ट्र सरकारने चीनी कंपन्याशी केलेल्या सामंजस्य करार स्थगितीवरून राज्य सरकारने का घुमजाव केले याबद्दल कोणतेही थेट भाष्य केले नाही.

भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत केलेल्या राज्यातील पाच हजार कोटींच्या प्रकल्पावर स्थगिती आणल्यासंदर्भात पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “ते करायलाच पाहिजे ना, जे राष्ट्र आपल्या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघते, आपल्याविरोधात कुरापती काढते अशा राष्ट्रांच्या विरोधात कडक भूमिका घेतलीच पाहिजे. चीनमध्ये तयार होणारी एकही गोष्टी भारतीयांना वापरू नये. सव्वाशे कोटी जनतेने हे असे केले तर चीन जागेवर येईल.”

तीन चीनी कंपन्यांशी १५ जूनला ५००० कोटी गुंतवणुकीचे महाराष्ट्र सरकारने केले. काल सकाळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हे करार स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र १२ तासांच्या आत घुमजाव करून करार रद्द केले नाहीत जैसे थे ठेवल्याचा खुलासा त्यांना करावा लागला. अजित पवारांच्या आजच्या वक्तव्यानंतरही त्या घुमजावाचा खुलासा होऊ शकला नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था