शेतकरी आंदोलनात पाकिस्तानचा हस्तक्षेपाचा प्रयत्न; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा गंभीर आरोप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलन गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. पाकिस्तानही त्याच्यात हस्तक्षेप करायला लागला आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर कृषी कायद्यांसंदर्भात तोडगा काढावा. संसदेचे अधिवेशन घेऊन त्यावर चर्चा करावी, अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे. Adhir Ranjan Chaudhary’s serious allegation

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शेतकरी आंदोलनात पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचे आरोप पूर्वीच केले होते. पाकिस्तानी अभिनेता हामजा अली अब्बासी याने कालच ट्विट करून पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले होते. Adhir Ranjan Chaudhary’s serious allegation

या खेरीज अनेक माध्यमांतून खलिस्तान समर्थक गट आणि इस्लामी गट शेतकरी आंदोलनात घुसखोरी करीत असल्याचे रिपोर्टही आले आहेत. या सगळ्यालाच एक प्रकारे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या पाकिस्तान विषयक वक्तव्यातून पुष्टी दिली आहे.



चौधरी म्हणाले, शेतकरी आंदोलन गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. पाकिस्तान देखील त्यात वेगवेगळ्या मार्गाने कसा हस्तक्षेप करता येईल, त्याचा लाभ आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा उठवता येईल, याचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळी माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची कोंडी लवकरात लवकर फोडावी.

Adhir Ranjan Chaudhary’s serious allegation

संसदेचे अधिवेशन बोलवून कृषी कायद्यांवर आणि त्यातील बदलांवर चर्चा करावी. पण संसदेचे अधिवेशन बोलवण्याची सरकारची इच्छाच दिसत नाही. विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनावर बोलू नये, असे सरकारला वाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात